
नाशिक: दि.२६ वार्ताहर
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालित जनता विद्यालय रामेश्वर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.ढेपले बी.के . यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी, आदि शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.पगार जी टी यांनी केले.छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री.ढेपले बी के यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जिवन कार्याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थी मनोगत व्यक्त करतांना कु. नुतन जाधव, कु. देवयानी निकम, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित व कार्याविषयी माहिती सांगितली.आभार श्रीमती. भामरे आर एम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.एम.के आहेर, श्री.गायकवाड एस.टी, श्री.परदेशी जी.बी, श्रीमती निकम पी.के, श्रीमती देवरे बी.पी, श्रीमती पगार, तसेच शिक्षकेतर सेवक श्री.
पाकळे भाऊसाहेब, श्री पगार जे.एस, श्री.पवार, श्रीमती मोरे उपस्थित होते.

