
बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारा दूरदृष्टीचा लोकराजा-मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे प्रतिपादन
ओझर:दि.२६ (वार्ताहर)
समाजातील वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान लोकराजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. त्यांचे समता, सामाजिक न्याय आणि मानवतेचे विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात. आपणही त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण समानता आणि समाज हितासाठी प्रेरणादायी योगदान देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी ओझर येथील ‘मविप्र’ संचालित सहकार महर्षी माधवराव बोरस्ते विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना केले. प्रारंभी प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रास्ताविकात पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी आरक्षण, शिक्षण, वसतीगृहांची स्थापना, स्त्रि उद्धार आणि जातीभेद निर्मूलन, समानता याविषयी माहिती दिली. याप्रसंगी शिक्षक आत्माराम शिंदे दादासाहेब सोनवणे भाऊसाहेब रौंदळ नरेंद्र डेरले मोहन क्षीरसागर मनोरमा सोमवंशी स्वाती बोरसे रेखा देशमाने मेघा शेजवळ शितल हांडोरे संगीता सोनवणे सोनल माळोदे आदी सर्व शिक्षक उपस्थित होते. फलक रेखाटन कलाशिक्षक सविता पवार मोहन क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन संगीत शिक्षिका शितल आहेर देशमुख यांनी केले.

