
नि:शुल्क 27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धचे आयोजन –
नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय,भोसरी,पुणे 39 तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी, राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली जाते. कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही.म्हणूनच श्रावण व निसर्ग या विषयावरील कवींनी दोन कविता पाठवाव्या.
नि:शुल्क ही काव्य स्पर्धा आहे.27 व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेतून निवडलेल्या कवितांना विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह सन्मानपत्र गुलाबपुष्प,श्रीफळ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येते.दरवर्षी या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे.सलग या स्पर्धेचे 27 वर्षे आहे.प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात येईल.
कवींनी आपल्या कविता 10 सप्टेंबर 2026 अखेरपर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्या.कवींनी आपला पूर्ण पत्ता,मोबाईल,पिन कोड सह कविता पाठवाव्या.
कविता पाठवण्याचा पत्ता-
अध्यक्ष प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे
अध्यक्ष- नक्षत्रांचं देण काव्यमंच साई सदन, ए/3,,महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक,भोसरी, पुणे 4110?39 येथे पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.
आतापर्यंत काव्यमंचने आठ अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन,170 प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्यमैफली, शेकडो काव्यबैठका, कार्यशाळा, काव्य सहलीचे आयोजन केले आहे.काव्यमं च्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहे.असे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे
आपला काव्यप्रेमी,
प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे
संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष
नक्षत्राचं देणं काव्यमंच
9657348622

