
नांदगाव ( प्रतिनिधी )नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्या मंदिरात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वा. ध्वजारोहण मा. मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विजय अण्णा परदेशी, माजी स्वातंत्र्यसैनिक श्री. मोकळ, मा. नंदाताई चव्हाण,मा
भिलोरे दादा मा. सुवर्ण आहेर माता पालक संघ उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य इ. अतिथी उपस्थित होते यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले.ध्वजगीत, समूहगान श्री. मुळे सर व गीतमंच च्या विद्यार्थिनींनी सादर केले मुख्या. सौं. जाधव मॅडम यांनी जॅक फ्रुट संदर्भात मोलाचा संदेश दिला. ज्ञानयात्री त्रैमासिकचे प्रकाशन सोहळा पार पडला. साधन कवायत, देशभक्तीपर नृत्य सादरीकरण, इंग्लिश speech विद्यार्थ्यांनी सादर केले.विविध कार्यक्रमनी हा राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला.सूत्रसंचालन श्री. बुरकूल सरांनी केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

