
मनमाड (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मनमाड, अभिनव बाल विकास मंदिर आणि आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मनमाड या शाखांचा एकत्रित “समाजदिन” अर्थात कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सन 1982 पासून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस 19 ऑगस्ट हा “समाजदिन” म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी प्रथमतः संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजपूजन श्री. बाळासाहेब साळुंखे (अध्यक्ष, व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते झाले. तर ध्वजारोहण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रा. राजाराम मुंगसे (मविप्रायण चे रचियेता) यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व समाजगीताच्या जयघोषात संस्थेच्या ध्वजाला सलामी देण्यात आली. यानंतर कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर अँड. बाबुराव ठाकरे, कर्मवीर अँड. विठ्ठलराव हांडे, डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात. प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी समाजदिन साजरा

करण्यामागचा उद्देश समजावून सांगितला. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थाला, पालकांना, शिक्षक, प्राध्यापक कर्मचारी यांना कर्मवीरांच्या कार्याची ओळख व्हावी हा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व कर्मवीरांवर भाषण केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक व ते प्राध्यापक राजाराम हिमेश यांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्था स्थापनेचा इतिहास समजावून सांगितला. संस्थेची पायाभरणी ही पुरोगामी विचारांवर आधारित असल्याने संस्थेत सर्व घटकांना सामावून घेतले जाते. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद वाक्य घेऊन 1914 मध्ये सुरू झालेल्या संस्थेने 112 वर्षात 512 शाखा सुमारे 3 लाख विद्यार्थी, 15 हजार सेवक वर्ग इतका विस्तार झालेला आहे. प्रारंभीच्या काळात उदाजी राजे पवार, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहु महाराज, कीर्तिवानजी निंबाळकर इ. संस्थेला आर्थिक मदत केली म्हणून त्या काळात संस्था उभी राहिली व बहुजन समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आली. त्यानंतर मार्च – एप्रिल 2026 मध्ये झालेल्या परीक्षेच्या वर्गनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. इतरही उल्लेखनीय काम केले आहे त्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री. नरेंद्र कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब साळुंखे यांनी संस्थेची कार्यपद्धती याबद्दल माहिती दिली. प्रसंगी व्यासपीठावर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दामू अण्णा डगळे, श्री. नरेंद्र कांबळे, श्री सुरेश शिंदे, श्री. सिद्धार्थ संसारे, श्री.विजय दरगुडे, श्री. दिनेश धारवाडकर, श्री. सुनील साळवे, श्री. शंकरराव बोडके, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. उपाली परदेशी, श्री. निलेश वाघ, श्री. अरविंद शिंदे, अभिनव बाल विकास मंदिर चे मुख्याध्यापक श्री. राहुल वाघ, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य श्री. अँथनी नायडू, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी श्री. सिद्धार्थ संसारे यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास उपयुक्त पुस्तके भेट दिली. तर श्री अरविंद शिंदे ( संस्थापक, अध्यक्ष गोविंदा पतसंस्था, मनमाड) यांनी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल शाळेसाठी बक्षीस ठेव योजना अंतर्गत सुरू 11000/- रुपये रकमेचा धनादेश मुदत ठेव करण्यासाठी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कावेरी काकळीज यांनी केले तर आभार प्रा. प्रमिला भुरूक यांनी मांडले.

