
नांदगाव :—-
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व शाखांच्या संयुक्त विद्यमाने ‘समाज दिन’ अत्यंत उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे-पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते समाज ध्वजाच्या ध्वजारोहनाने झाली. यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत व समाज गीताने वंदन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी समाज दिनाचा उद्देश व हेतु स्पष्ट केला.
विद्यालयाच्या गीतमंचाने संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर आधारित ओघवत्या शैलीत पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
उपस्थित सर्व मान्यवर संस्थेचे सभासद व मान्यवरांचे शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले कविवर्य संदीप जगताप यांनी ‘मविप्र समाज दिनाची संकल्पना’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. “भारत हा कृषीप्रधान देश असून मविप्र संस्थेची निर्मिती आणि कृषी संस्कृती यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी संस्थेच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे-पाटील यांनी कर्मवीरांच्या त्यागाचे स्मरण केले. “कर्मवीरांनी मविप्र संस्थेची उभारणी आणि जोपासना करण्यासाठी गावोगावी फिरून मदत गोळा केली, आणि बहुजन समाजाकरिता शिक्षणाची दारे खुली केली. ” असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी सारजाबाई गणपत मोरे, पार्वतीबाई उर्फ नानी रावसाहेब थोरात, गीताबाई देवराम वाघ तुळजाबाई पुंजा गोवर्धने, रेणुकाताई भाऊसाहेब हिरे, श्रीमंत राणीसाहेब पवार, शकुंतलाबाई बाबुराव ठाकरे, भागीरथीबाई निवृत्ती पवार, भारतीताई लक्ष्मण गोवर्धने, पुष्पाताई व्यंकटराव हिरे, तसेच क्रांतिवीरागंणा लीलाताई पाटील (तुफान सेना) यांच्या ऐतिहासिक कार्याचा विशेष उल्लेख केला. आज मविप्र संस्था वैद्यकीय, अभियांत्रिकी,कृषी, व्यवस्थापन, फार्मसी, आणि पारंपरिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात नव्हे तर देशातील अग्रगण्य म्हणून ओळखली जाते हे सांगितले.
या कार्यक्रमास मविप्र सभासद राजाराम गवांदे, सुनील बोरसे, बाळासाहेब कवडे जेष्ठ सदस्य शरद पगार,पुंजाराम जाधव ,शरद पाटील, गोटू निकम, जयवंत चव्हाण,विजय काकळीज
बाळासाहेब कदम ,बाबूलाल सावंत, अशोकराव जाधव, शामराव शिंदे ,दत्तात्रय काकळीज, पोपटराव पवार ,विठ्ठल पाटील,प्रभाकर कवडे, रवींद्र कवडे ,रमेश पवार, जगन्नाथ काकळीज ,वाल्मीक काकळीज ,विठ्ठल काकळीज ,देवाजी कदम, प्रभाकर काकळीज,प्रकाश पाटील, शामराव पाटील, संदीप बोरसे, अरविंद पाटील, अशोक शिंदे, अरविंद बोरसे ,भगवान देशमुख ,विठ्ठल आहेर, दिलीप गोटे, ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. प्रवीण निकम, डॉ.गणेश चव्हाण,नितीन आहेर, संजय आहेर,जनार्दन पवार,समाधान पाटील,आबासाहेब सोमवंशी, सिद्धार्थ पवार, सर्व संकुलाचे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,जेष्ठ पत्रकार संजय निकम, संदीप जेजुरकर, महेंद्र पगार,सुरेश शेळके, बाबासाहेब बोरसे,विजय बडोदे, किरण भालेराव, किरण काळे, उपस्थित होते.
कार्यक्रमास प्राचार्य नरेंद्र पाटील,प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, मुख्याध्यापक बाळकृष्ण बदादे,प्राचार्या पूनम मढे, प्राचार्य तुकाराम घुगे, डॉ प्रज्ञा पगार तसेच विविध शाखांचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिला पवार व दत्तात्रय भिलोरे तर आभारप्रदर्शन डॉ.संजय मराठे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

