
इंदिरा माध्यमिक विद्यालयात मविप्र समाज दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा…
वासोळ– (प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालय, मविप्र समाज दिन साजरा करण्यात आला. शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचवून वंचित घटकांना प्रवाहात आणणारे आणि“ बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद अंगीकारणारे संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी समाज दिनाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष मा.श्री.दगडु काका भामरे, मा.श्री. स्वप्निल पाटील लोकनियुक्त (सरपंच वासोळ) श्री.महाले अंकुश व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षक-पालक संघ अध्यक्ष व सदस्य. मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस. तसेच इतर मान्यवर, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.महाले अंकुश संतोष होते. १९१४ मध्ये लावलेल्या छोट्याशा शैक्षणिक रोपट्याचे आजच्या वटवृक्षात झालेले रूपांतर आणि कर्मवीरांनी केलेल्या कार्याचा आढावा मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस. यांनी प्रस्ताविकेतून दिला. त्यानंतर संस्थेच्या ध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण श्री.महाले अंकुश यांच्या हस्ते झाले. गीतमंचाने राष्ट्रगीत, राज्यगीत आणि समाजगीत सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. खाटीक बुशरा, मोरे मानवी ,पवार अनुष्का हिने सांगितले की कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षणाची संधी मिळाली. आज आम्ही आत्मविश्वासाने शिक्षण घेत आहोत, याचे संपूर्ण श्रेय कर्मवीरांना जाते. हिने आपल्या मनोगतात म्हटले की, कर्मवीरांचा आदर्श आम्हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षक श्री.निकम एस.के.यांनी समाज दिनाचे महत्त्व उलगडून सांगितले. शालेय समिती सदस्य श्री.स्वप्निल पाटील यांनी कर्मवीरांचे कार्य सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगत त्यांच्या त्यागाची व कष्टांची माहिती दिली. यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले होते. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सूत्रसंचालन श्री.आहेर एस.सी.यांनी केले तर आभार श्री.सावंत व्ही.बी यांनी मानले.

