
सायखेडा (प्रतिनिधी)|मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयामध्ये मविप्र समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी मविप्र समाजाचे जेष्ठ सभासद बाळासाहेब कांडेकर हे होते

.प्रमुख अतिथी मविप्र निफाड तालुका संचालक मा. श्री शिवाजी आप्पा गडाख , अभिनव शालेय समिती अध्यक्ष श्री जगन्नाथ डेर्ले , व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नितिन गावले, मा. श्री प्रभाकर रायते, शिक्षकपालक संघाचे उपाध्यक्ष श्री सचिन खालकर, सहसचिव रामा कुटे जेष्ठ सभासद श्री भाऊसाहेब गायखे, श्री अनिल कातकाडे श्री मनोज भूतडा, अविनाश सुकेणकर श्री अश्याक शेख, श्री पंगे सर श्री पवन कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजदिन ध्वजपुजन व ध्वजारोहण जेष्ठ सभासद श्री बाळासाहेब कांडेकर यांच्या हस्ते तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, विद्येची देवता सरस्वती ,छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहु महाराज व सर्व कर्मवीरांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.

समाजदिना निमित्त रांगोळी स्पर्धा , पुष्परचना दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शालेय गीतमंच्या ने उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मा.मुख्याध्यापक श्री यु के पवार यांनी समाज दिन साजरा करण्यामागचा हेतू व संस्थेची मुहूर्तमेढ रोवणारे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याविषयी कृतज्ञता म्हणून समाजदिन साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन केले.उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक मा.श्री यु के पवार व पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार अभिनव बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम यांनी गुलाबपुष्प देऊन केला.एस.एस.सी. व एच.एस.सी.माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थ्यांना रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. समाजदिनानिमित्त मेहंदी, पुष्परचना,रांगोळी,वक्तृत्व व,निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देखील रोख बक्षीस व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यालयातील आर्थिक दुर्बल विद्यार्थांना विद्यालयाच्या व देणगीदारांच्या वतीने शालेय गणवेश व बुटांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थी मनोगत कु आराध्या जाधव व काव्या सोनवणे यांनी व्यक्त केले.शिक्षक मनोगत श्रीमती अर्चना आरोटे यांनी केले आपल्या मनोगतात त्यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात व इतर सर्व कर्मवीरांनी संस्थेची स्थापना करून समाजातील सामान्य व तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली असे विचार व्यक्त केले..प्रमुख अतिथी मनोगतातून श्री अविनाश महाजन यांनी संस्थेचा इतिहास व नावलौकिक बद्दल माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतातून श्री बाळासाहेब कांडेकर यांनी मविप्र संस्थेचा इतिहास व आजची संस्थेची वाटचाल या बाबत माहिती देत विद्यालयातील मुख्याध्यापक ,शिक्षक विद्यार्थी या सर्वांचे कौतुक करून समाजदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री आवारे सर एन सी सी प्रमुख श्री शिंदे सर, श्री गांगुर्डे सर श्री कर्पे सर श्रीमती पी पी शिंदे मॅडम श्रीम कापडी मॅडम श्री महाले सर यांचा सत्कार करण्यात आला.. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.सुंदर फलक लेखन, श्री विलास महाले व श्रीमती कापडी यांनी तर रांगोळी व इतर स्पर्धा नियोजन श्रीमती शिंदे पी पी व श्रीमती घुले यांनी केले.सुत्रसंचालन श्री अवधूत आवारे व श्रीमती शिंदे पी पी यांनी केले. आभार अशोक टर्ले यांनी मानले. सांस्कृतिक समिती प्रमुख श्री ज्ञानेश्वर कर्पे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

