
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) मविप्र समाजाचे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व विद्यार्थी विकास मंडळ च्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. सुधाकरराव नाईक यांचा २१ आँँगष्ट ‘जलसंधारण दिन ‘म्हणून महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रभात फेरी घालण्यात आली.व उत्साहपूर्ण वातावरणात जलसंधारण्यावर घोषणा देण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी या प्रभात फेरीस प्रथम मान्यता दिली. महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या छोट्या छोट्या नालाबंध विद्यार्थी घेऊन भेट देण्यात आले व याप्रसंगी सुधाकरराव नाईक यांनी या जलसंधारणावर जे काही काम केले त्याविषयीचे माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली व या छोट्या छोट्या नालाबंधातून शेतकऱ्यांना तसेच गावांना कोणता फायदा होतो हेही याप्रसंगी सांगण्यात आले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एम.आहिरे या विषयावर माहिती देऊन सर्वाचे आभार मानलेत.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे,प्रा बी.पी.मोरे,प्रा कर्वे प्रा.डॉ.आर.टी आहिरे सर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

