
नाशिक ( प्रतिनिधी ), दिनांक २१ ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने आयोजित शालेय कॅरम स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी,पंचवटी येथे शालेय कॅरम स्पर्धा खेळविल्या जात आहेत.आज १४ वर्षे मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये जु. स. रुंगठा शाळेच्या चेतन मानकर याने अंतिम सामन्यात रचना विद्यालयाच्या मोहम्मद मुसा पिरजादे याचा २-० असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर सेंट सादिक स्कुलच्या हसनैन मनियार याने जेलरोडच्या डी. एफ. डी. माध्यमिक विद्यालयाच्या राजवीर कीर्तने याला पराभूत करून तिसरा क्रमांक मिळविला. या गटात सेंट लॉरेन्स स्कुल अश्विननगर शाळेचा खेळाडू आरुष यादव याने पाचवा आणि नाशिक केंब्रिज स्कुलच्या ऋग्वेद बोकील याने सहावा क्रमांक मिळविला. या सहा खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. १४ वर्षे मुलांच्या गटात नाशिक महानगर परिसरातील विविध शाळांच्या १८३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रिती करवा यांनी शुभेच्छा दिल्या आणि खेळाडूंनी चांगला खेळ करून जिंकण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे असे सांगितले.
यावेळी जिल्हा कॅरम असोसिएशनचे आयोजक आनंद खरे, भूषण भटाटे, राजेंद्र प्रधान आणि विविध शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यश अहिरे, नकुल चावरे, उत्कर्ष परदेशी, वेदांती पवार, कृष्णा तेलगड, गौरी तेलगड, प्रणव रामजली, भरत, गोविंद साळवे, वेदांती पवार आदी परिश्रम घेत आहेत.

उद्या १९ वर्षे मुले आणि मुली या गटाच्या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती स्पर्धा प्रमुख प्रीती करवा यांनी दिली.
अंतिम निकाल – १) चेतन मानकर (जु. स. रुंगठा शाळा), २) मोहम्मद मुसा पिरजादे (रचना विद्यालय) ३) हसनैन मुजफ्फर मणियार (सेंट सादिक स्कुल), ४) राजवीर कीर्तने (डी. एफ. डी. मध्य. विद्यालय, नाशिकरोड ), ५)आरुष यादव सेंट लॉरेन्स स्कुल, नवीन नाशिक, ६) ऋग्वेद बोकील (नाशिक केंब्रिज स्कूल, नाशिक)

