
नांदगाव ( प्रतिनिधी ) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ व ‘विद्यार्थी कल्याण मंडळ’ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ऑगस्ट रोजी जलसंधारणाचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांच्या शुभहस्ते स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.
‘जलसंधारण दिना’च्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांच्या संमतीने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या नजीक असणाऱ्या बंधार्यापर्यंत क्षेत्रभेटीसाठी नेण्यात आले.

सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ. शेंडगे व राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.के.पवार यांनी जलसंधारणाचे प्रणेते स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जीवन कार्याची व जलसंधारणाची माहिती, उपयुक्तता,गरज व आवश्यकता यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

जलसंधारण केल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते व त्याचा शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेतीसाठी फायदा होतो. जागोजागी केलेल्या नालाबंधांमुळे जंगली प्राणी,पशु पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय होते. यामुळे वन्यजीवांचे व पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धन साधले जाते. ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ या संकल्पनेचे महत्त्व ही याप्रसंगी विशद केले.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे, आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक डॉ.एम.बी.आटोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.जी.व्ही.बोरसे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.एम.आहिरे, डॉ.राजेन्द्र वाघ, प्रा.बालाजी मोरे, प्रा.कर्वे, प्रा.आर.टी.आहिरे प्रा.महाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेंडगे यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रा.बी.एम.अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन कर्मचारी केतन पाटील, मनीष बोरसे, थोरात इ.नी परिश्रम घेतले.

