
सिन्नर 🙁 प्रतिनिधी ) संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर येथे दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यावरणपूरक शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत २०४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कलाशिक्षिका सौ. विद्या निचित व श्री. संतोष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. मुख्याध्यापिका सौ. अरुणा चोथवे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, प्रत्येकाने घरी पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणपतीची स्थापना करावी, असे आवाहन केले.

सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात सुरळीतपणे पार पडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासोबतच सर्जनशीलता व कलात्मकतेला प्रोत्साहन मिळाले.

