
नांदगाव ( प्रतिनिधी)भाजप पक्षाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रामुख्याने
एस आय आर चा शेवटचा टप्पा आणि येणाऱ्या 30 तारखेला मन की बात कार्यक्रम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन जी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला यात
महाराष्ट्रातील विनोदजी तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री पदी तर माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आणि पियुष जी गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ना. गिरीश भाऊ महाजन यांची घोषणा झाल्याबद्दल त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव टाळ्यांचा गजरात करण्यात आला यावेळी नांदगाव तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात आला पीक कर्ज, पिक विमा सरसकट कर्जमाफी, तसेच लाईटच्या समस्या, तहसील कार्यालय अंतर्गत विविध तक्रारी ,प्रत्येक बुथवर त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावर चर्चा करून पालकमंत्री गिरीश भाऊ यांच्यापर्यंत या सगळ्या समस्या घेऊन लवकरच भाजपा नांदगाव मंडल शिष्टमंडळ करून भेट घेणार आहे आणि त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून देणार आहेत यावेळी सशक्त बूथ करण्यासाठी कशा योजना राबवाव्यात याची चर्चा करण्यात आली काही पदाधिकारी पक्षविरोधी वर्तन करीत असल्याने त्यांची तक्रार वरिष्ठ स्तरावर करून त्यांना निलंबित करण्यात यावे असाही सूर बैठकीमध्ये दिसून आला बैठकीस मंडल अध्यक्ष संजय भाऊं सानप व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक दत्तराज छाजेड माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात मंडल महामंत्री सचिन पांडे भगवान व्हडगर मंडल उपाध्यक्ष अशोक पेंढारकर दत्तू शेलार रमेश निकम सचिव शरद उगले शांताराम जाधव महिला मोर्चा अध्यक्ष रेखाताई शेलार शहर संयोजक सतीश शिंदे ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश जेजुरकर एस सी मोर्चा तालुकाप्रमुख धनराज मंडलिक पंचायतराज तालुकाध्यक्ष अरुण पवार आयुष्यमान भारत तालुका प्रमुख धनंजय देशमुख वकील आघाडी तालुका प्रमुख ॳॅड.शेखर पाटील ज्येष्ठ नागरिक तालुका संयोजक सुरेश कुमावत ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख बीएलए टू तसेच संजय दळवी देशमुख काका सतीश पगारे तालुकाप्रमुख ओबीसी युवा अध्यक्ष हर्षल ढासे वाहतूक सेल तालुकाध्यक्ष निलेश पगारे एसटी मोर्चा प्रमुख निंबा मोरे
किसान मोर्चाचे सुभाष काका कवडे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते

