
जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार
नाशिक / परभणी (प्रतिनिधी) परभणी येथे झालेल्या १८ व्या मिनी राज्यस्तरीय फेन्सिंग चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. KM Fence Club चा खेळाडू आणि मराठा हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव नरेंद्र डेर्ले याने १० व १२ वर्षांआतील गटात फॉईल वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीच्या जोरावर तो जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेन्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेतच नाशिकच्या शौर्य यादव आणि अनन्या सुळे यांनी देखील आपले कौशल्य दाखवत ब्राँझ पदक प्राप्त केले.या सर्व विजेत्या खेळाडूंचे फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष अशोक दुधारे सर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे आणि मार्गदर्शक प्रशिक्षक प्रसाद परदेशी यांनी अभिनंदन केले. प्रणवच्या राष्ट्रीय संघातील निवडीमुळे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, तालुका संचालक शिवा पाटील गडाख, उपसभापती डी. बी. मोगल, शोभाताई बोरस्ते यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय स्तरावरही पदकाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

