
नाशिकरोड:-( रविंद्र मालुंजकर) शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या महिला सभासदांनी श्रीकृष्णाच्या जीवनावरील कृष्णलीला या कार्यक्रमाचे सर्वांगसुंदर सादरीकरण करत ज्येष्ठ रसिकांची दाद मिळवली.
कृष्णलीला कार्यक्रमात प्रारंभी ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’ या गीतावर महिला सभासदांनी नृत्य केले. कृष्णजन्म, कालियामर्दन, गवळण, कृष्ण-सुदामा भेट, रासलीला आणि दहीहंडी इत्यादी प्रसंग, ‘हले हा नंदाघरी पाळणा, सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही, मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडा गं’ अशी विविध गाणी, गवळणी आणि कृष्ण जीवनावरील प्रसंग कलावंतांनी रसिकांच्या डोळ्यासमोर उभे केले.
कृष्ण-सुप्रिया बनसोड, वसुदेव, सुदामा आणि कालिया-सुनंदा गोसावी, देवकी आणि सत्यभामा- मनीषा जोशी, दवंडीवाला आणि बलराम-मंदाकिनी मुदलियार, गोपी-मृणाल प्रभुणे, निशा कपोले-गोपी आणि पेंद्या-वैजयंती चंद्रात्रे, यशोदा-सुधा डमरे, सवंगडी -वैजयंती चंद्रात्रे, अरुणा बर्गे, शोभना व्यवहारे, द्रोपदी-वैजयंती डांगे, रुक्मिणी आणि सुदाम्याची बायको-ज्योती जोशी यांनी कृष्णलीला कार्यक्रमातील विविध व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाने सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. कल्पना वैद्य यांनी सूत्रसंचालन करताना कार्यक्रमात रंग भरला. अनिता जोशी यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी आणि गवळणी सादर करीत वातावरण भक्तिमय केले. वैजयंती डांगे यांनी निवेदन करत आभार मानले. वैजयंती चंद्रात्रे यांनी सभासद वाढदिवस सत्कार कार्यक्रमाचे वाचन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, खजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, रवींद्र चंद्रात्रे, वसंत उपासनी, प्रकाश भालेराव, मिलिंद ताथोडे, धानापुणे, दिलीप भिंगारकर, शिल्पा वैद्य, सिंधू उपासनी, मालती दाभाडे, शैलजा कुलकर्णी, श्रद्धा शहा, शालिनी डहाळे, मंजुषा ताथोडे, दीपाली भिंगारकर, मंगल मोहरील, जयश्री नाईक, शशिकला वाणी, श्रीवास्तव यांनी विशेष परिश्रम घेतले.

