
सिन्नर ( प्रतिनिधी )सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. श्यामसुंदर झळके यांना कोपरगाव येथील बी द चेंज फाऊंडेशनचा” महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 ” जाहीर झाल्याबद्दल नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते तसेच थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे यांच्या उपस्थितीत डॉ.झळके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा साई पालखी निवारा,शिर्डी येथे रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

