
नाशिक येथील रग्बीची राष्ट्रीय खेळाडू उज्ज्वला रामदास घुगे आशियाई रग्बी अमिरात सेव्हन सिरीज २०२६ या स्पर्धेच्या माध्यमातून २९ व ३० ऑगस्ट रोजी चीन मधील सुझाऊ शहरात संपन्न होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली असून ती या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
आपल्या रग्बी खेळातील कौशल्यासाठी शारीरिक क्षमतेची कसोटी लागते,चापल्य व धाडसी- त्वरीत निर्णय या गुणांच्या जोरावर तीने हे यश संपादन केले आहे. उज्ज्वला घुगे हीची भारतीय संघातील निवड ही नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.

तिच्या निवडीचे जिल्ह्यातील रग्बी असोसिएशन चे अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष सुधाकर गोडसे, प्रशिक्षक व सचिव मनोज कनोजीया व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील , सहसचिव अनिल ढोकणे यांचेसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

