
ओझर: दि.२९ वार्ताहर
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव आयोजनाचा हेतू विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जून ते ऑगस्ट २०२६ मध्ये चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर, शुद्धलेखन, वकृत्व, वैयक्तिक मराठी लोकनृत्य या सर्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी दि.२८ रोजी चित्रकला स्पर्धा विश्वसत्य इंग्लिश मिडीयम स्कूल,ओझर येथे वाचनालयाचे अध्यक्ष मा.श्री. वि.फ.अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरचिटणीस श्री.प्रशांत अक्कर, सहचिटणीस श्री.बाळासाहेब ढेपले, सहचिटनिस श्री.नंदकिशोर सोनवणे सदस्य श्री.दिलीप चौधरी उपस्थित होते. यावेळी ग्रंथपाल सौ.गौरी कासार सहा. ग्रंथपाल, कु गौरी गायकवाड, लिपिक सौ. माधुरी दमाले, शिपाई सौ. सुनीता आंबेकर पर्यवेक्षक श्री.किशोर दमाले, उदय आंबेकर, कु.प्रज्ञा कासार यांनी परिश्रम घेतले. या परीक्षेत पहिली ते दहावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.

