
ओझर: दि.२९ वार्ताहर
“निसर्गाचे रक्षण हेच आपल्या संस्कृतीचे खरे पूजन असून “पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, आणि आरोग्यदायी जीवन शैलीचा संदेश देणारा भारतीय संस्कृतीतील वटपूजन महत्त्वाचा उत्सव आहे असे शिक्षिका मेघा शेजवळ यांनी प्रास्ताविकात सांगितले. वटपूजा गुरुवर्य हेमंत भट यांनी सांगितली.’वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुष्य असावे, जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत मिळावी’

अशी अपेक्षा यानिमित्त महिलानी मनोभावे पूजा करताना देवाला साकडे घातले. वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे दीर्घायुष्य, निसर्गपूजा, प्रेम, कुटुंब, निष्ठा, नाते आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून जीवनमूल्यांची आठवण करून देतो. झाडांचे संरक्षण, संवर्धन, आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना राजश्री पिंगळे यांनी, वडाचे झाड जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र असून मातीची धूप रोखण्यास आणि भूजल संवर्धनास मदत करते तसेच प्रदूषण कमी करण्यास आणि स्वच्छ हवा निर्माण करण्यास हातभार लावते. हवामान बदलाच्या काळात मोठी वृक्षसंपदा जपणे ही काळाची गरज आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. वटपूजेस शितल आहेर अश्विनी ठाकरे राजश्री टरले कीर्ती बच्छाव मेघा शेजवळ राजश्री पिंगळे शकुंतला आगळे संगीता सोनवणे वैशाली मोगल सोनल माळोदे अर्चना घुमरे संगीता भदाणे राजश्री मोहन सरोज खालकर जे बी पाटील संगीता शेटे वर्षा पाटील श्रीमती परदेशी श्रीमती गायकवाड आदी शिक्षिका उपस्थित होत्या. नियोजन व सूत्रसंचालन संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी केले.

