
नांदगाव: दि.२९ प्रतिनिधी
“निसर्गाचे रक्षण हेच आपल्या संस्कृतीचे खरे पूजन असून “पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, आणि आरोग्यदायी जीवन शैलीचा संदेश देणारा भारतीय संस्कृतीतील वटपूजन महत्त्वाचा उत्सव आहे असे येथील प्रसाद कुलकर्णी गुरुजी यांनी वटपूजा का करावीयाची माहिती प्रसाद कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितली.’वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुष्य असावे, जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत मिळावी’ अशी अपेक्षा यानिमित्त महिलानी मनोभावे पूजा करताना देवाला साकडे घातले. वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे दीर्घायुष्य, निसर्गपूजा, प्रेम, कुटुंब, निष्ठा, नाते आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून जीवनमूल्यांची आठवण करून देतो. झाडांचे संरक्षण, संवर्धन, आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना येथील महिलांनी मत व्यक्त केले

, वडाचे झाड जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र असून मातीची धूप रोखण्यास आणि भूजल संवर्धनास मदत करते तसेच प्रदूषण कमी करण्यास आणि स्वच्छ हवा निर्माण करण्यास हातभार लावते. हवामान बदलाच्या काळात मोठी वृक्षसंपदा जपणे ही काळाची गरज आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. वटपूजेस हनुमान नगर,पारिजात कालनी, नांदगाव शहरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. नियोजन व सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.


