
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव गेल्या १५ ते १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेले नांदगाव येथील ज्येष्ठ पत्रकार प्रज्ञानंद दयाराम जाधव यांना यंदाचा प्रतिष्ठित “महाराष्ट्र साई गुणरत्न पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला आहे. यु अॅड मी फाऊंडेशन आणि झिनीत क्राऊन पिक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला आहे.
प्रज्ञानंद जाधव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच अन्यायाविरुद्ध दंड थोपटले.शेतकरी प्रश्न, भ्रष्टाचार,आरोग्य,शिक्षण आणि सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. “जनतेचा बुलंद आवाज” म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या लेखणीमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळाला आहे. निडर पत्रकारिता आणि वस्तुनिष्ठ बातमीदारी हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची आणि पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घ सेवेची दखल घेत यु अॅड मी फाऊंडेशन आणि झिनीत क्राऊन पिक्चर यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
पुरस्कार वितरण सोहळा हा ३० ऑगस्ट २०२६, रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजे दरम्यान शिर्डी येथील साई छत्र या हाॅटेल मध्ये दिमाखा संपन्न झाला या कार्यक्रमाला चित्रपट निर्माते उद्योजक म्हणून मनोज कदम यांच्यासह सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने सुंदर अशी आकर्षक ट्रॉफी,प्रमाणपत्र, मेडल,शाल देऊन प्रज्ञानंद जाधव यांना सन्मानित करून यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गोरगरीब आणि वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या या पत्रकाराचा सन्मान म्हणजे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचा सन्मान असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

