
नाशिक.(प्रतिनिधी.) मालेगाव येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय,आंतर राष्ट्रीय कवी,लेखक,समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांच्या एक हायकू या हायकू जपानी काव्य प्रकारातील कवितांचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सकाळ पेपरचे माजी संपादक उत्तमजी कांबळे, नाशिक निवास स्थानी करण्यात आले.या कार्यक्रमांस सागर जाधव चांदवड,रमेश वरखेडे,प्रकाश हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.एक हायकू कविता संग्रहाचे मुखपृष्ठ संजय निकम यांनी स्वतः तयार केले आहे.प्रख्यात कवी विष्णू थोरे,चांदवड यांनी या कविते बद्दल सखोल अभिप्राय नोंदविला आहे.कवी संजय निकम यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कार्यक्रम अध्यक्ष डॉ.रमेश वरखेडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कवी सागर जाधव यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांचे आभार मानले.हा कार्यक्रम नाशिक येथे दि 30.8.2026 रविवार रोजी मोठ्या उत्साहात संप्पन झाला.

