
लासलगाव ( प्रतिनिधी) मा. ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या. या बसेसच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून नागरिक, प्रवासी व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या नवीन बसेसचे लोकार्पण केले.

लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी व कृषी केंद्र असून प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन लासलगाव बस आगाराचा ताफा अधिक सक्षम करण्यासाठी नामदार भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांतून या नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. गावागावांतील नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, बाजारपेठ आणि विविध शासकीय सेवांशी जोडण्यासाठी एसटीची भूमिका महत्त्वाची आहे.

त्यामुळे लासलगावसह येवला-लासलगाव मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगली वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जात आहे. नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच प्रवाशांची मागणी आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन नवीन मार्ग, बसफेऱ्या व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे ग्वाही यावेळी दिली.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, मंगेश गवळी, भाऊसाहेब बोचरे, सचिन दरेकर, विनोद जोशी, पप्पू सस्कर, अशोक नागरे, पांडुरंग राऊत, बालेश जाधव, संतोष राजोळे, राजेंद्र चाफेकर, लतिफ तांबोळी, राजू जाधव, माधव जगताप, राजेंद्र घोडे, इस्माईल मोमिन, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे, ज्ञानेश्वर दरेकर, सागर खलसे, सद्दाम शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लासलगाव बस आगाराचे चालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते.

