
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८१ वा दिवस

*मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति* जो ह्या जगात अनेकत्व बघतो त्याला मृत्यू पुन्हा पुन्हा गाठत असतो, तो जन्म-मरणाच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. सर्वकाही एकच आहे असे जर आपल्याला दिसत असेल तर मग आपल्या पक्षी शरीराचाही मृत्यू नाही आणि मनाचाही मृत्यू नाही. मग आपल्याला शारीरिक किंवा मानसिक कोणताही मृत्यू शक्य नाही. जगातील सर्वच देह माझे देह आहेत, म्हणून माझा देहदेखील नित्यच होय, झाडेझुडपे, जीवजंतू, चंद्रसूर्य, फार काय पण समस्त विश्वब्रह्मांडच माझा देह होय, मग माझ्या या देहाचा नाश कसा होईल ? मग माझा देह मरणे कसे संभवते? प्रत्येक मन, प्रत्येक विचार माझाच आहे. मग मला मृत्यू कसा येणार? आत्मा कधी जन्मतही नाही, कधी मरतही नाही - ज्या वेळी आपल्याला ह्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्या वेळी सर्व संदेह नाहीसे होऊन जातात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ११ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २ सप्टेंबर २०२६
★ १९७६ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार, समिक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा स्मृतीदिन.
★ १९७० कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिलास्मारक राष्ट्रपती व्ही. व्ही गिरी यांच्या हस्ते समारंभपूर्वक राष्ट्राला अर्पण केले.


