
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८४ वा दिवस

पारमार्थिक गुरूने साधकामधे संक्रामित केलेल्या ज्ञानापेक्षा अधिक उच्च आणि अधिक पवित्र असे काहीही नाही. जर एखादा मनुष्य पूर्ण योगी झालेला असेल, तर त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती आपोआपच होते. एखादा साधक पूर्ण योगी बनतो, तेव्हा त्याला हे ज्ञान आपोआप अंतःस्फूर्तीने प्राप्त होते. बाह्य साधनांपेक्षा अंतर्गत परिवर्तन आणि गुरूचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा ठरतो. ते ज्ञान ग्रंथांतून प्राप्त होऊ शकत नाही. पुस्तके किंवा ग्रंथ केवळ माहिती देऊ शकतात, परंतु आध्यात्मिक अनुभूती आणि आत्मज्ञान हे केवळ गुरूच्या कृपेनेच साध्य होते. तुम्ही जरी जगाचे चारही कोपरे धुंडाळले किंवा हिमालय, आल्प्स, कॉकेशस हे पर्वत किंवा गोबीचे अथवा साहाराचे वाळवंट किंवा समुद्राचा तळ या सर्व ठिकाणी जरी शोध केला, तरी ते ज्ञान तुम्हाला गुरू भेटेपर्यंत कदापि लाभणार नाही. सद्.गुरुची प्राप्ती हीच पहिली आणि अनिवार्य पायरी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास १४ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६
★ गोपाळकाला
★ १८८८ भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ, शिक्षकतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन त्यांच्या गौरवार्थ संपूर्ण भारतात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
★ समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत राहून युवापिढीतून ज्ञानाधिष्टित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या समस्त आचार्यांप्रती, गुरुजनांप्रती, शिक्षकांप्रती कृतज्ञता, साष्टांग दंडवत.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

