
मालेगाव | ४ सप्टेंबर २०२६ मोतीबाग नाका, मालेगाव येथील विराम उद्योग समूह यांच्या विराम ऑटोमोबाईल्स् (यामाहा) या भव्य शोरूमचे उद्घाटन आज शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चाळीसगावचे आमदार श्री. मंगेश चव्हाण उपस्थित होते.
प्रसंगी ना. दादाजी भुसे यांनी शोरूमची पाहणी करून यामाहा कंपनीच्या विविध दुचाकी वाहनांची माहिती घेतली. आधुनिक सुविधा, ग्राहकांसाठी उपलब्ध सेवा तसेच वाहन विक्री व विक्रीनंतरच्या सेवांमुळे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

नवीन शोरूमच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दर्जेदार दुचाकी वाहने आणि उत्तम ग्राहकसेवा उपलब्ध होणार असून, स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यासही हातभार लागणार आहे. या भव्य शोरूमच्या शुभारंभाबद्दल ना. दादाजी भुसे यांनी चौधरी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना पदाधिकारी, चौधरी परिवाराचे सदस्य, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

