
नाशिक :- साप्ताहिक कुसुमाग्रज नगर तर्फे घेण्यात आलेल्या विनोदी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून प्रथम क्रमांक वरमाईचा तोरा :ले. सौ.अलका चंद्रकांत दराडे यांना तर द्वितीय क्रमांक कतरिनाची स्वारी,सोसायटीच्या दारी ले. सौ.अलका र. कोठावदे यांना देण्यात आला आहे.
जड झाले ओझे या अंजली दीपक कोनकर यांच्या कथेस तृतीय तर अबोली : दिलीप कजगावकर व राज : माधुरी संजीव कामत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. अशी माहिती कुसुमाग्रज नगरचे संपादक रामदास नागवंशी यांनी दिली.

निवासी संपादक प्राचार्य प्र द कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर कथा आल्या होत्या. परीक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक कवी विवेक उगलमुगले यांनी काम पाहिले तर पत्रकार निरूपणकार पद्माकर देशपांडे स्पर्धेचे समन्वयक होते. स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रायोजक मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, दिवाळी अंकाचे मानद संपादक प्रवीण जोशी, गोविंद झा आदींचे सहकार्य लाभले.
: १) अलका दराडे (नाशिक)
२)अलका कोठावदे, (नाशिक)
३)अंजली कोनकर, (ठाणे)
४)दिलीप कजगावकर,(पुणे)
५)माधुरी कामत,(पुणे)

