
सिन्नर ( प्रतिनिधी ) धनलक्ष्मी शिक्षण संस्था संचलित एसएसके. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडझिरे येथे वक्तृत्व स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली.
धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. उज्ज्वला कातकाडे, मुख्याध्यापिका सौ सुजाता नंद,प्रा. सचिन गुरुळे प्रा प्रल्हाद पानसरे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर तसेच देशभक्ती यांसारख्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धांचे परीक्षण डॉ. मंगल सांगळे यांनी केले. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यावर परीक्षक डॉ. मंगल सांगळे यांनी जाहीर केला. यावेळी अनुक्रमे साक्षी मते, अक्षरा रसाळ, ऋतुजा खाडे या पहिल्या तीन विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच कृतिशील उपक्रम सातत्याने सुरू असतात व यापुढेही नाविन्यपूर्ण पद्धतीने घेतले जातील, असे प्रतिपादन यावेळी डॉ. कुणाल कातकाडे यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रा.देशपांडे, प्रा. राजपूत, प्रा. सरोदे,प्रा. नर्गिस अन्सारी तसेच विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना बर्के व तनुजा कातकाडे या विद्यार्थिनींनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार श्रद्धा कटाळे हिने मानले.

