
साकोरा ( प्रतिनिधी ) पेङकाई संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा ङाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिवस देशभर साजरा केला जातो माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी विद्यार्थी यांनी शिक्षकाची भूमिका घेऊन अध्यापन केले. विद्यालयात एक वेगळाच उत्साह दिसून आला. आपले मोठे बंधु भगिनी आपल्याला अध्यापन करती आहे याचा आनंद प्रकर्षाने दिसून येत होता. मानवी बोरसे हिने विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून काम बघितले तसेच चैताली बोरसे, पुष्पा सापटे, प्रिती वतार, सई एरम, रोहित बोरसे, अनिवृध्द पवार, साई एरम,जयश्री मानभाव आदी शिक्षक बनले होते अध्यापन करणे सोपे नाही असे अनुभव सांगितले लहान इयत्ता मधून रनविजय बोरसे, संस्कृती बच्छाव, प्रांजल कदम, यशश्री बोरसे, कविता घुगसे, साक्षी भसरे, स्वप्नील बोरसे, यांनी ङाँ राधाकृष्ण यांच्या जिवणा बद्दल माहिती दिली. शिक्षिका पूनम बोरसे, बोरसे व्ही पी मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी सर्वपल्ली यांचे कार्य विद्यार्थी यांना समजावून सांगितले. सूञसंचल कावेरी सोनवणे, आभार चैताली बोरसे हिने मानले वंदेमातरम म्हणून समारोप ने झाला.

