
निगडोळ:- ( प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात ५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.मा.मुख्याध्यापकबोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.इ.१०वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत इ.८ वी ते १०वी च्या वर्गांना अध्यापन करून शिक्षक दिनाचा आनंद घेतला.माया वाघ,भावना भोये, प्रियंका मालसाने,यश मालसाने, ऋतुजा डोखळे,श्वेता ढगे, तेजस्विनी मालसाने,चित्रा गोडसे, प्रियंका ढगे,रूपाली मालसाने,साहिल रहेरे,सुशांत रहेरे,सार्थक शिंदे,तन्वी मालसाने,सोनाली गवळी,रोहित महाले,प्रविण मालसाने,कार्तिक भरसट,सोहम केदारे इ.विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली व आपली मनोगते सादर केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.जेष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस, पी.व्ही.गायकवाड मॅडम व बेद्रे एस.व्ही.यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर वैचारिक प्रकाशझोत आपल्या मनोगतातून टाकला.विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन भावना भोये व माया वाघ यांनी केले.आभार प्रदर्शन तन्वी मालसानेने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जेष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे.यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरे व्ही.ए व भामरे टी.व्ही.यांनी अनमोल सहकार्य केले.

