
मुंबई : मनमाड (ता. नांदगाव) येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी भीमसृष्टी प्रकल्पासंदर्भात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता मा. सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ साहेब यांच्या उपस्थितीत समिती कक्षात, मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाली या बैठकीत भीमसृष्टी प्रकल्पाचे नियोजन, निधी, अंमलबजावणी, प्रशासकीय मान्यता तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा केली गेली. भीमसृष्टी ची सविस्तर माहिती घेतल्यानंतर मंत्री महोदयांनी मोठा निधी उपलब्ध करून देण्यास समर्थता दर्शविली.बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, समाजकल्याण आयुक्त, जिल्हाधिकारी नाशिक, नगरपरिषद मनमाडचे मुख्याधिकारी, वास्तुविशारद तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी भीमसृष्टी चा प्लॅन समजावून सांगितला असता मंत्री महोदयाने आनंद व्यक्त केला.

