नांदगाव ( वार्ताहार ) ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ, नाशिक आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालय, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य आनंद जोर्वेकर व त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २७ व्या ‘बालकवी काव्यवाचन स्पर्धे’ला नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तालुक्यातील १७ शाळांमधील तब्बल १५५ स्पर्धकांनी तीनही गटांत सहभाग नोंदवत कविता, साहित्य व अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार सादर केला. स्पर्धेचे मान. श्री. दत्तराज छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. ८ वी अ मधील कु. नक्षत्रा घुगे व मैत्रिणींनी ईशस्तवन सादर केले. त्यांना श्री. राजेश भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी श्री. सुरेश नारायणे (कुमार गट), सौ. प्रतिभा खैरनार (किशोर गट),सौ. अक्षदा कुलकर्णी व श्रीम. ज्योत्स्ना चव्हाण (बाल गट) यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडली. मान्यवर व अतिथींचा परिचय श्री. प्रविण अहिरे यांनी करून दिला,

ज्ञानवर्धिनी संस्थेचे श्री. राजेश भुसारे, श्री. नितीन कापडणीस, सौ. वैशाली भोसले व सौ. कांचन लवटे यांनी केले.
सदस्य श्री. गुलाब पाटील, श्री. भास्कर मधे, सौ. रूपाली झोडगेकर व श्री. मुकुंद बागूल,शिक्षक प्रतिनिधी श्रीम. सुनीता देवरे व श्री. सुरेश नवसारे यांच्यासह तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ज्ञानवर्धिनी संस्थेचा ‘रूपेरी काव्यहोत्र’ हा काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले._
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचलन श्री. गुलाब पाटील ह्यांनी केले. सूत्रसंचालन श्री. मुकुंद बागूल यांनी केले, तर श्रीम. सुनीता देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेचा निकाल बाल गट – ( इ ३ री ते ५ वी ) प्रथम क्र कु. साहिल युवराज बोरसे (साकोरा), द्वितीय कु. शिवन्या प्रविण छत्रे (साकोरा), तर तृतीय कु. अकीरा अमिन
किशोर गट( इ ६ वी ते ८ वी )
प्रथम क्र .भावना प्रकाश गुढेकर (नांदगाव), द्वितीय रोनक रविंद्र बनसोड (मनमाड), तर तृतीय अवनी दिनेश बजाड (नांदगाव) यांनी पटकाविला. कुमार गट ( इ९ वी ते १२ वी ) प्रथम क्र .आयुष वाळीबा काकड (मनमाड), द्वितीय वैष्णवी कैलास सानप (मनमाड), तर तृतीय श्रद्धा ज्ञानेश्वर बोगीर (नांदगाव) यांनी मिळविला. . तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १५५ स्पर्धकांना प्रमाणपत्र व काव्यसंग्रह देऊन कौतुक करण्यात आले._

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सकाळ व दुपार सत्रातील विविध समित्यांमधील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


