
ओझर:दि.३० वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचलित सहकार महर्षी माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिवव्याख्याते सोपान वाटपाडे लिपिक फकीरा नाठे सेवक पुंडलिक जाधव हे पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्या निमित्त त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी आत्माराम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक सतीश केदार यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा सत्कार मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर पर्यवेक्षक दशरथ शिंदे लिपिक मुरकुटे सुचेता मोगल भावना खालकर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.

