
भाऊसाहेब बच्छाव व सौ. अलका बच्छाव यांचा सेवापूर्ती निमित्ताने सत्कार करतांना नांदगाव तालुका संचालक इंजि.अमितभाऊ बोरसे (पाटील), रमेश आप्पा बोरसे, प्राचार्य डॉ एन.यु.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.आर.मराठे, प्रा. बी.के.पवार

नांदगाव (प्रतिनिधी) : “संस्थेचे मोठेपण तिच्या भव्य इमारतींमध्ये नसून, संस्थेसाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असते. भाऊसाहेब बच्छाव यांनी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यातून संस्थेचा गौरव वाढविला असून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा,” असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमितभाऊ पाटील यांनी केले.येथील मविप्र संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर भाऊसाहेब बाजीराव बच्छाव यांच्या नियमित वयोमानानुसार झालेल्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य रमेश अण्णा बोरसे, सदस्य रामनाथ गायकवाड, प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. आर. मराठे, सत्कारमूर्ती भाऊसाहेब बच्छाव व सौ. अलकाताई बच्छाव व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक व सत्कारमूर्तींचा परिचय प्रा. निकम यांनी करून दिला.महाविद्यालय व मविप्र संस्थेच्या वतीने भाऊसाहेब बच्छाव व सौ. अलकाताई बच्छाव यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

.प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांनी आपल्या मनोगतात बच्छाव यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि सेवाभावी वृत्तीचा गौरव करत, त्यांची कार्यपद्धती इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. उपप्राचार्य डॉ. ए. आर. मराठे यांनीही त्यांच्या सेवेला सलाम करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रा. विकास बच्छाव, मुलगी व सुनबाई यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. सुरेश माधवराव नारायणे व संपत आहेर यांनीही भाऊसाहेब बच्छाव यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.सत्काराला उत्तर देताना

भाऊसाहेब बच्छाव म्हणाले, “कै. आमदार मालोजीराव मोगल तसेच संस्थेचे माजी सरचिटणीस मा. खासदार कै. वसंतराव पवार यांच्या माध्यमातून मला या संस्थेत सेवा करण्याची संधी मिळाली. सेवाकाळात अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वेळेचे महत्त्व जपत आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सेवा करण्याचा प्रयत्न केला. सुख-दुःखाचे अनेक प्रसंग आले, मात्र कर्तव्यात कधीही कसूर केली नाही.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. के. पवार यांनी केले, तर आभार प्रा. जी. डी. बोरसे यांनी मानले.या समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी कर्मचारी, विद्यार्थी, हनुमाननगर व पारिजात कॉलनीतील नागरिक, मित्रपरिवार, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

