
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१७ वा दिवस
सतत साधनाभ्यास करीत गेल्याने हळूहळू जशी दृढता उत्पन्न होते, त्याचप्रमाणे सुरवातीला अनिच्छेने का होईना पण निष्काम कर्म आरंभिल्यास आपोआप चित्त त्यात मग्न होऊ लागते. मगच हळूहळू परहितार्थ कर्म करण्याची सत् प्रवृत्ती निर्माण होते. अनिच्छेने का होईना, एकदा परसेवा करून पाहा, तिने तपस्येचे फळ मिळते की नाही ते आपणास कळेल. परहितार्थ केलेल्या कर्माने मनाचा सारा स्वार्थीपणा आणि वक्रता नष्ट होते व मग माणूस निष्कपट मनाने परहितार्थ प्राणही वेचावयास हळूहळू सज्ज होतो. स्वहित साधण्यासाठी ज्या देहाचा आपण अभिमान बाळगतो तो हा आपला देह आपण परहितार्थ अर्पण करीत आहोत या विचाराने त्या अहंकाराचाही विसर पडतो. निःस्वार्थ बुद्धीने केलेली परसेवा हीच खरी तपस्या ठरते आणि माणसाला उन्नत करते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ ९ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ३० जून २०२६
★ १९०५ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी “सापेक्षतावादाचा” सिध्दांत प्रसिद्ध केला.
★ १९१७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य, राजकीय सामाजिक नेते, स्वातंत्र्यसेनानी, ब्रिटिश संसदे पहिले भारतीय सदस्य पितामह दादाभाई नौरोजी यांचा स्मृतीदिन.
★ आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन.

