
निसर्ग मित्र समिती धुळे यांच्या सौजन्याने श्री विलास हिंमत सोनवणे जिल्हा परिषद शाळा गावदरा (वेहेळगाव) ता. नांदगाव जि. नाशिक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वेहेळगाव केंद्रातील श्री पंकज अरुण सोनवणे जिल्हा परिषद शाळा कुसुम्बीनाला (वेहेळगाव) ता. नांदगाव यांनाही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री विलास सोनवणे यांनी गावदरा शाळेचा कायापालट केला त्याच अनुषंगाने त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शालेय परिसर पूर्णपणे खडकाड आहे.. दूर दूर माती नाही तरी देखील त्यांनी शालेय परिसरात परसबाग फुलवली आहे. शाळेच्या आजूबाजूला झाडे लावली आहेत.तेच नाही तर जास्त झाडे वाढू शकत नाही अशा प्रतिकूल परिस्थिती त्यांनी कुंड्यामध्ये झाडे लावून ते जगवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांचे हे निसर्ग प्रेम आणि शाळेतील विविध उपक्रम यामुळे धुळे येथील महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, धुळे यांचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, संतोषराव आबा पाटील (राज्य महासचिव) डी. बी. पाटील (धुळे जिल्हाध्यक्ष )राजेंद्र भदाणे (अध्यक्ष नियोजन समिती )यांच्या मार्गदर्शना खाली तसेच धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशीं तसेच अनेक सामाजिक व राजकीय जेष्ठ मान्यवऱ्याच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी पंकज सोनवणेसर सागर सोळुंकेसर , बिरारीससर,योगेश देवरे,मनीषा देवरे अनिता सोनवणे , पूजा सोनवणे तसेच संजय पाटीलसर व रामचंद्र पाटीलसर यांचे अनमोल सहकार्य लाभले. पुरस्कार मिळाल्याबद्दल शालेय व्यस्थापन समिती गावदरा,गावातील पालक व ग्रामस्थ, वेहेळगाव केंद्रातील शिक्षक तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व अधिकारी यांनी श्री सोनवणे यांचे अभिनंदन केले.

