
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८७ वा दिवस

नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन ।
यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् ।। कठोपनिषद् (१.२.२३)
हा आत्मा वेदाध्ययनाने प्राप्त होणे शक्य नाही, बुद्धीद्वारा किंवा खूप शास्त्रश्रवण केल्यानेही तो प्राप्त होत नसतो. हा आत्मा ज्याला वरतो म्हणजेच ज्याला निवडतो वा ज्याचा स्वीकार करतो तोच त्या आत्म्याचा लाभ करून घेऊ इच्छितो, त्यालाच आत्मा निज स्वरूप प्रकट करून दाखवितो. आत्म्याचा साक्षात्कार किंवा ईश्वराची प्राप्ती ही केवळ बौद्धिक ज्ञानाने, पाठांतराने किंवा विद्वत्तेने होत नाही. त्यासाठी संपूर्ण शरणता, शुद्ध अंतःकरण आणि आत्मकृपेची आवश्यकता असते. तुम्ही ब्रह्माशी नित्य युक्त आहात, स्वरूपतःच युक्त आहात, अभिन्न आहात, पुण्यकृत्य फक्त अज्ञानाचे आवरण दूर करण्यास साहाय्यभूत होत असते, इतकेच. आपण स्वरूपतःच ‘आझाद’ स्वाधीन, स्वतंत्र वा मुक्त आहोत; आपण ह्याची उपलब्धी करून घ्यावयास हवी, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घ्यावयास हवा.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास १७ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२६
★ १९३३ गेली पन्नास वर्षे आपली स्वरमोहिनी कायम ठेवणाऱ्या जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्मदिन.
★ १९६० स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राजकीय नेते, प्रखर भ्रष्टाचार विरोधक व इंदिरा गांधी यांचे पती फिरोज जहांगीर गांधी यांचा स्मृतीदिन
★ १९९१ मराठी लेखक, कवी, साहित्यिक वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
★ जागतिक शारीरिक उपचार दिन…

