
सिन्नर: ( प्रतिनिधी ) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय,सिन्नर येथे पालक शिक्षक संघाच्या वतीने विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व
शिक्षक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
प्रस्ताविकात् सविता ठोके यांनी पालक शिक्षक कार्या विषयी माहिती दिली

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालविकास प्रकल्प अधिकारी सिन्नर श्री.गणेश सहाणे यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना सांगितले,"अपयशाने खचून जाऊ नका,मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.छोटी स्वप्ने बघून स्वतःला मर्यादित ठेवू नका,मोठे ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थिनींना नवी ऊर्जा व आत्मविश्वास मिळाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड श्री.श्रीराम क्षत्रिय यांनी शिक्षकांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे
मॅडम यांनी पालक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या उपक्रमाचा गौरव केला

पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवनेे यांनी पाहुण्याचा परिचय करून देत शाळा विकासासाठी पालक शिक्षक संघ करीबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर
शिक्षक प्रतिनिधी प्रिया कुलकर्णी
पालक सदस्य सुनील कुऱ्हे,कोमल लहाने,सविता ठोके,गुलाब कांदे,कावेरी गुंजाळ,जयश्री सोनवणे,जयश्री वाघ, पल्लवी भानूर, रोहिणी करंजकर,स्मिता क्षत्रिय,रेश्मा जहागीरदार ,कविता सातपुते
इत्यादी पालक सदस्य उपस्थित होते.
पालक शिक्षक संघाच्या वतीने विद्यालयातील शिक्षकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत
सन्मानचिन्ह(पदक ),पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाल्याने उपस्थित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सूत्रसंचालन पालक सदस्य रेशमा जहागिरदार यांनी केले तर आभार पालक सदस्य कविता सातपुते यांनी मानले.

