नांदगाव ( प्रतिनिधी)आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या आदेशाने नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने नांदगाव रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले.
नांदगाव शहरातील रेल्वे अंडर पास हा शहरातील मुख्य वर्दळीचा व शहराच्या दोन भागांना जोडणारा मार्ग आहे. या अंडर पास मध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असुन मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकत आहेत. शाळकरी मुले, महिला व वयोवृद्ध नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यताअसतांना आपण प्रत्यक्ष पाहणी करून अंडर पास मधील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी व खड्डे त्वरित बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची विनंती करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, नूतन कासलीवाल, प्रकाश शिंदे, दीपक मोरे, नंदू पाटील, बापू जाधव, अविनाश केदारे, ॲड सचिन साळवे,मुश्ताक शेख उपस्थित होते.