
पिंपरखेड – ( प्रतिनिधी ) आज मांडवड येथे झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयाच्या १४ वर्षे आतील विद्यार्थ्यीनींनी बलाढ्य के.एम.के. विद्यालयाच्या संघाला हरवून तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले व जिल्हा स्तरावर आपली निवड पक्की केली.
आज मांडवड येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रत्येक सामना अनेक गुणांच्या हक्काने जिंकून फायनल मध्ये धडक मारत आपले या वर्षाचे तालुक्याचे पहिले वहिले विजेतेपद पटकावले व जिल्हा स्तरावर आपले कसब दाखवण्यासाठी सज्ज झाले.
तसेच याच विद्यालयाच्या १७ वर्षे आतील मुलींच्या कबड्डी संघाने देखील फायनल मध्ये धडक मारत अतिशय नेत्र दीपक अशी कामगिरी केली व उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यीनींना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. संजय कांदळकर सर , श्री. उत्तम सोनवणे सर तसेच श्रीमती अमिता पारखे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
काल झालेल्या कबड्डी स्पर्धेत मुलांच्या संघाने देखील उत्कृष्ट कामगिरी नोंदवत आपली चूणूक दाखवून दिली.यशस्वी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कामगिरी करून दाखवल्या बद्दल विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा.वसंतराव नाना मवाळ,संचालक मा. शिवराम आबा कांदळकर तसेच इतर सर्व संचालकांनी व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी सर, कैलास पठाडे सर, लक्ष्मण जाधव सर, संदीपभाऊ मवाळ, आबासाहेब सोनवणे आदींनी अभिनंदन करून कौतुक केले आहे व जिल्हा स्तरावर विजेतेपद पटकावण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

