
मोरेवाडी ( प्रतिनिधी ) सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई व राईझ बायोनिक्स बंगलोर या संस्थेमार्फत तसेच समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अस्थिव्यंग विद्यार्थी साहित्य मोजमाप शिबिर दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी गट साधन केंद्र मालेगाव येथे पार पडले.नांदगाव तालुक्यातील कासारी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथील इ.१ लीचा विद्यार्थी चैतन्य चिंतामण मोरे यास सीपी चेअर,जयपूर फूट आणि कॅलिपर असे तीन प्रकारचे दिव्यांग साहित्य मिळाले.सदर साहित्य मिळण्याकामी गटशिक्षणाधिकारी श्रीमती आरती देशमुख मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे साहेब,योगेश थोरात साहेब,शैलेश टिळेकर साहेब,केंद्रप्रमुख राजेंद्र काटकर साहेब,विशेष शिक्षक सचिन जाधव सर,मुख्याध्यापक गणेश बागुल सर यांचे विशेष सहकार्य लाभले.


