
मोहाडी (वार्ताहर) : श्रावण अमावस्येच्या दिवशी अभिनव बालविकास मंदिर मध्ये बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला.
मविप्र संचालक प्रविण नाना जाधव यांच्या हस्ते बैलांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश सोमवंशी अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष रामराव पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक देशमुख शालेय समिती सदस्य एस. एस. जाधव, दीपक जाधव, सुदर्शन जाधव निखिल भाऊ जाधव ज्येष्ठ पत्रकार उत्तम काका जाधव आदी उपस्थिती होते.
विद्यार्थ्यांना आपल्या कृषिप्रधान संस्कृतीची व परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला .अश्विनी बस्ते यांनी सूत्रसंचलन केले तर मुख्याध्यापिका सोनाली देशमुख यांनी प्रास्ताविकातून बैलपोळा सणाचे महत्त्व व शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे स्थान याबाबत माहिती दिली
कार्यक्रमाचे आयोजन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
तर बैलपोळा सुंदर असे फलक लेखन रोहिणी लोखंडे व अश्विनी बस्ते यांनी केले छायाचित्रण श्रीमती इखे मॅडम यांनी केले.

