
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९१ वा दिवस

वेदांच्या ज्ञानकांडात उपनिषदांचा समावेश असून त्याला 'वेदान्त असे नाव आहे. 'श्रुतिग्रंथांचे शिर' असेही त्यास म्हटले आहे. उपनिषदे ही अशा सामर्थ्याच्या मोठ्या खाणी आहेत. अखिल जगाला तेजस्वी बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे; त्यांच्या योगाने सर्व जग चैतन्यमय व सामर्थ्यशाली करता येईल, ते उत्साहाने भरून टाकता येईल. उपनिषदांमधील 'अहं ब्रह्मास्मि' मी ब्रह्म आहे हा विचार सर्व जाती, पंथ आणि गरीब-श्रीमंत अशा सर्वांना एकच दर्जा देतो. हा विचार समाजातील शोषित, दलित आणि दीनदुबळ्या लोकांना त्यांची खरी शक्ती ओळखायला लावतो आणि त्यांना गुलामगिरी झुगारून स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देतो. सर्व जातीच्या, पंथांच्या दीनदुबळ्या व दलित लोकांना जागृत करून त्यांना ललकारून सांगतील की आपापल्या पायावर उभे राहा व मुक्त व्हा. मुक्ती वा स्वाधीनता शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वाधीनता हीच उपनिषदांची घोषवाक्ये आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २१ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६
★ १६६६ आग्रा येथून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगड येथे सुखरुप येऊन पोहोचलेत.
★ १९१२ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राजकीय नेते, प्रखर भ्रष्टाचाराचे विरोधक व इंदिरा गांधी यांचे पती फिरोज जहांगीर गांधी यांचा जन्मदिन.

