
नाशिक: दि.11 (वार्ताहर)
जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी आर भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर डी.आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी के सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी एस सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री. सावंत बी एस सर यांनी कर्मवीर डी.आर.भोसले यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी के सर यांनी आपल्या भाषणातून कर्मवीर डी.आर.भोसले यांनी संस्थेसाठी केलेले योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सावंत बी एस सर यांनी केले. व आभार श्री भामरे पी एस सर यांनी मानले. कार्यक्रमास व सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते.

