नाशिकरोड:-(प्रतिनिधी )
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात राखी तयार करणे आणि शाडू मातीपासून गणपती तयार करणे कार्यशाळेतील उत्कृष्ट निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिक्षिका आशा चौधरी आणि सविता सानप-घुगे यांनी परीक्षण केले.
राखी तयार करणे स्पर्धेतील लहान गटातील आर्या आडके, सोनाली मोरे, धनश्री सानप आणि मोठ्या गटातील लक्ष्मण बोंबले, पूर्वा मोरे, ईश्वरी आडके, धन्वंतरी गायधनी यांच्यासह गणपती तयार करणे स्पर्धेतील लहान गटातील सोनाली मोरे, भाग्यश्री माळी, पल्लवी पिंपळे आणि मोठ्या गटातील सोनिया सिंह, आयेशा ढाकरके, प्रतीक आडके यांना उपक्रमशील शिक्षक कैलास लहांगे पुरस्कृत पारितोषिक देण्यात आली. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.