
नाशिकरोड : ( प्रतिनिधी ) पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सुभाष ढोकणे यांची निवड झाली सुभाष ढोकणे यांनी यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे उर्वरित पदाधिकारी निवड पुढील प्रमाणे. सचिव प्रकाश गरुड. सहसचिव विलास इंगळे खजिनदार शरद लोहार व सहखजिनदार प्रियंका शिसोदे यांची एकमताने निवड करण्यात आली.पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य उमाकांत वाकलकर शाळा समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपमुख्याध्यापक संजय पाटील उपप्राचार्य संगीता पवार पर्यवेक्षक डॉक्टर गजानन होडे श्रावण सूर्यवंशी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

