
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९२ वा दिवस

सवय लावून घेणे किंवा सोडणे आपल्याच हाती असते. वाईट सवयी चांगल्या सवयींनी कह्यात आणता येतात. चांगल्या सवयी लवकर लागत नाही तर वाईट सवयी लवकर सुटत नाही. सतत सत्कृत्ये अत्यंत आवश्यक आहेत. काया-वाचा-मन यांचे पावित्र्य आवश्यक आहे. सत्य, त्याग आणि सेवा यांचे अधिष्ठान आपल्या ठायी हवे. दृढनिश्चय, धैर्य, चिकाटी या तीन गोष्टी असतील तर तुमच्यापैकी प्रत्येकजण अचाट कामे करतील. जेणेकरून आत्मविश्वासाने आपले संकल्प व आपल्या योजना कृतीत उतरवतील. यासाठी जीव ओतून, प्राणपणाने प्रयत्न करतील.
स्वामी विवेकानंद...
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २२ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६
★ वराह जयंती
★ चक्रधर स्वामी जयंती
★ १९२९ लाहोर कटातील क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांचा स्मृतीदिन.
★ १९३२ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन.

