
मोहाडी : (बातमीदार) आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर शाळेत पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामरावजी पाटील होते.
कार्यक्रमास सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सर, स्कूल कमिटी सदस्य शामा अप्पा जाधव, उत्तम जाधव थोरात विद्यालय प्राचार्य शिवाजी शिंदे पर्यवेक्षक संजीव पठाडे सह पालक व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
प्रास्ताविक अभिनव मुख्याध्यापिका सोनाली देशमुख यांनी केले. पालक प्रतिनिधी सुशील जाधव, भावना जाधव, चेतन लोखंडे ,विक्रम आहिरे, झोमन आदींनी आपल्या मनोगतातून शाळेच्या कार्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील वाटचालीसाठी पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सर यांनी केले.
पालक मेळावा यशस्वी आयोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. फलक लेखन धनंजय जाधव यांनी तर फोटोग्राफी रोहिणी लोखंडे यांनी केल.अश्विनी बस्ते यांनी सूत्रसंचलन तर उपस्थितांचे आभार धनश्री शंकपाळ यांनी मानले. पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

