
सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित महात्मा फुले शैक्षणिक संकुलात ३६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता, शिक्षण आणि लोकसेवेच्या माध्यमातून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक विचारवंत मा. श्री. विश्वास माधवराव देवकर यांचे “लोकविश्वासाचे केंद्र – शिक्षक” या विषयावर एकदिवसीय व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. नामदेवराव लोणारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट करत देवकर यांचा परिचय करून दिला.

व्याख्यानाच्या प्रारंभी देवकर यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसेवी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, “या पवित्र प्रांगणात येणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून मीदेखील एक साधक म्हणून समाजकार्य करीत आहे,” असे सांगत श्रोत्यांशी भावनिक नाते जोडले.
आजच्या काळात शिक्षकांना लोकविश्वासाचे केंद्र बनताना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर त्यांनी भाष्य केले. पालक व मुलांचा वाढता मोबाईल वापर, एकल पाल्यांची वाढती संख्या, बदलती जीवनशैली, मुलांचे पालकांच्या आवाक्याबाहेर जाणारे वर्तन आणि समाजाकडून शिक्षकांवर वाढलेल्या अपेक्षा यांचा त्यांनी परखड उहापोह केला. या आव्हानांवर मात करण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाज यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
शिक्षकांच्या अडचणींवर प्रकाश टाकताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्याची भूमिका, घरातील अध्ययनासाठी आवश्यक वातावरणाचा अभाव, मोबाईलचा अतिरेकी वापर आणि अध्यापन प्रक्रियेत निर्माण होणारे व्यत्यय यांसारख्या मुद्द्यांवरही विचार मांडले.
“शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक आणि पदाधिकारी यांनी परस्परांच्या भावना समजून घेत आपुलकीचे नाते निर्माण करावे. संस्था हे आपले घर समजून कार्य केल्यास नव्या समाजनिर्मितीचे कार्य अधिक प्रभावीपणे घडू शकते,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थितांमध्ये सकारात्मकतेची आणि जबाबदारीची पेरणी केली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री सचिन चव्हाण
(अध्यक्ष संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक)
संस्था पदाधिकारी मा.श्री. नामदेव लोणारे (सेक्रेटरी), मा.श्री. जुगल गवळी (सह सेक्रेटरी), मा.सौ. मंगलताई झगडे (अध्यक्षा, शालेय व्यवस्थापन समिती महिला महाविद्यालय), मा.श्री. प्रभाकर गोळेसर (माजी संचालक), मा.श्री. राजेंद्र आंबेकर (माजी संचालक), मा.श्री. राजेंद्र लोंढे (संस्थेचे सभासद), तसेच
शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवर मा.श्री. निवृत्ती महात्मे (माजी मुख्याध्यापक), मा.श्री. रवींद्र भवरे (प्राचार्य, सिन्नर महाविद्यालय), मा.श्री. एस.बी. देशमुख (मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष), मा.श्री. रामदास ढोली (प्राचार्य, वाजे विद्यालय), मा.श्री. मधुकर काळे (मुख्याध्यापक, गुळवंच विद्यालय), मा.श्री.राजेंद्र अंकार ,मा.श्री. श्यामसुंदर झळके, मा.श्री.काकड सर, मा.श्री. गोविंद मोरे, मा.श्री. रमेश बलक, मा.श्री. राजेंद्र महात्मे, मा.सौ.अलका खैरनार, मा.श्री.डॉ. आनंद घोडे, मा.श्री. डॉ. जी.एल. पवार, मा.श्री. गणेश वाजे (अध्यक्ष एन.के. वाजे बहुउद्देशीय संस्था), मा.श्री. राहुल वरंदळ (संस्था शिक्षणाधिकारी), मा.श्री. मधुकर देशमुख (प्राचार्य, म.ज्यो. फुले शैक्षणिक संकुल), मा.सौ. संगीता राजगुरू (मुख्याध्यापिका), मा.श्री. एकनाथ माळी (उपप्राचार्य), मा.सौ. सविता काठे (पर्यवेक्षिका), तसेच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महिला महाविद्यालयातील सर्व सन्माननीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी मोरे यांनी ओघवत्या शैलीत केले. संकुलाचे माजी प्राचार्य श्री. निवृत्ती महात्मे यांनी देवकर यांचे आभार मानले. उपप्राचार्य मा. श्री. एकनाथ माळी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, संचालक, पदाधिकारी व विविध संस्थांतील प्राचार्य यांचे आभार व्यक्त केले.
अत्यंत प्रेरणादायी आणि मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या या व्याख्यानासाठी संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

