
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९४ वा दिवस

गीता आपल्याला शिकविते - आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्यासाठी या जीवनातच आपल्याला लढा दिला पाहिजे. म्हणून जीवनापासून आपण पळ काढता कामा नये. उलट त्याच्यापासून जे काही मिळविता येईल ते मिळविण्यासाठी झटले पाहिजे. उच्च गोष्टींच्या लाभासाठी केल्या जाणाऱ्या संघर्षाचे गीता हे प्रतीक असल्यामुळे ती युद्धक्षेत्रावर सांगितली गेली ही घटनाच मोठी काव्यात्मक आहे. एका पक्षाचा नेता जो अर्जुन त्याचे सारथ्य करीत असलेले श्रीकृष्ण अर्जुनाला दुःखी न होण्याचा, मृत्यूला न भिण्याचा उपदेश करतात. याचे कारण हे की, आत्मा अमर आहे व जे काही परिवर्तनशील आहे ते मानवाचे खरे स्वरूप असू शकत नाही हे त्यांना माहीत होते. एकामागून एक अशा अनेक अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला तत्त्वज्ञान व धर्म यांमधील उच्च सत्यांचा उपदेश करतात.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २४ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६
★ ऋषिपंचमी
★ श्री गजानन महाराज पुण्यतिथी, शेगाव
★ भारतीय अभियंता दिन.
★ १८६० अभियंते, विद्वान, मुत्सद्दी, म्हैसूर संस्थानचे दिवाण भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन.
★ १९५३ श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड
★ १९५८ दिल्ली दूरदर्शनचे प्रेक्षपण प्रायोगिक तत्त्वावर सुर झाले.
★ दूरदर्शन दिन.
★ आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.

